Marathi

"मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचे पत्र आले आहे. धमक्या देऊन माझे निर्णय बदलता येणार नाहीत. धमक्या देणाऱ्या...
20/06/2026

"मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचे पत्र आले आहे. धमक्या देऊन माझे निर्णय बदलता येणार नाहीत. धमक्या देणाऱ्यांनी आतापर्यंतचा माझा इतिहास वाचावा" असं IAS तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे...

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय IAS अधिकारी तुकाराम मुंढे (अन्न व औषध प्रशासन आयुक्त) आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचे पत्र आले होते... याप्रकरणी त्यांनी थेट भूमिका घेत, "माझे निर्णय धमक्यांना भुलून बदलणार नाहीत," असे सडेतोड उत्तर दिले आहे...

धमक्या देणाऱ्यांना आपल्या 21 वर्षांच्या कार्यकाळातील धडाकेबाज कारवायांचा इतिहास बघण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.. सध्या राज्यभरात अन्न भेसळीविरुद्ध IAS तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला आहे...

श्री स्वामी समर्थ
18/06/2026

श्री स्वामी समर्थ

18/06/2026
तुकाराम मुंढे सारखी व्यक्ती प्रत्येक विभागात असायला पाहिजे. 👌वडापावचा प्रवास ३ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत झाला. पूर्वी ...
15/06/2026

तुकाराम मुंढे सारखी व्यक्ती प्रत्येक विभागात असायला पाहिजे. 👌
वडापावचा प्रवास ३ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत झाला. पूर्वी वडापाव वर्तमानपत्रात दिला जायचा. चांगल्या न वापरलेल्या कागदाची किंमत तरी किती असायची? ग्राहक वडापाव महाग झाला तरी पैसे देतच होता. मग स्वच्छ, न वापरलेला आणि अन्नपदार्थांसाठी योग्य कागद का वापरला जात नव्हता?
नियम तर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. पण यंत्रणा झोपलेली असल्यामुळे विक्रेते शाई लागलेल्या वर्तमानपत्रात अगदी गरम वडा देत होते. कागद भिजून त्यावरील शाई वड्यावर चिकटली तरी ग्राहकाला तोच वडापाव खावा लागत होता.
मग अचानक आठवडाभरात सर्वत्र बदल कसा झाला? फक्त एक अधिकारी बदलला आणि सगळीकडे खाकी कागदी पिशव्या दिसू लागल्या. याचे कारण म्हणजे त्या अधिकाऱ्याला आपल्या अधिकारांची आणि जबाबदारीची जाणीव आहे. तो कोणाच्याही रिमोट कंट्रोलवर काम न करता नियमांची प्रभावी अंमलबजावणी करतो. नियम नवीन नाहीत; फक्त आता ते खऱ्या अर्थाने लागू होताना दिसत आहेत.

Address

Solapur
413211

Telephone

+917719838052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share