Avdhut-अवधूत

Avdhut-अवधूत श्री स्वामी समर्थ
(1)

साधारणपणे पंचाहत्तरी ओलांडलेली, कमरेतून थोडी वाकलेली म्हातारी गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. हातामध्ये केसपेपर होता, कुठं...
16/07/2026

साधारणपणे पंचाहत्तरी ओलांडलेली, कमरेतून थोडी वाकलेली म्हातारी गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. हातामध्ये केसपेपर होता, कुठं जायचं कळत नसावं. गर्दी भरपूर होती, तेवढ्या गर्दीतून आजीनं पेपर कसा काढला असेल हाच प्रश्न पडला होता.
"आजी काय झालंय?"
त्यांना फारसं ऐकू येत नसावं. तीनचार वेळेस विचारल्यावर म्हातारी म्हणाली, "काही नाही बाबा."
"काही नाही तर मग दवाखान्यात का आलात आणि सोबत कोण आहे?"

फिकट झालेलं नऊवारी लुगडं, पदर डोक्यावर, पदराआडून बाहेर डोकावत असलेले चंदेरी केस. कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यातील काळ्या मण्याची पोत सुरकुतलेल्या गळ्याला चिटकून बसली होती. जुन्या शेवाळलेल्या विहिरीच्या खोल काळ्याभोर पाण्यासारखे तिचे डोळे कोणालातरी शोधत होते.

म्हातारी गोंधळलेली दिसत होती, काय बोलावं त्यांना कळत नसावं. आज्जीला बसायला सांगितलं. एका नर्सनं तिला आपुलकीनं काही प्रश्न विचारले. सगळ्यांचं शांत बोलणं ऐकून आजी म्हणाली,
"माझा मुलगा घेऊन आलाय मला."
"गाव कोणतं?"
एकतर आजीला बोललेलं लवकर कळत नव्हतं. एकच गोष्ट तीनदा विचारावी लागत होती.
"असं सांगा ना आजी, काय झालं तुम्हाला आणि मुलगा कुठं आहे?"
काही क्षण थांबून म्हातारी म्हणाली,
"पलीकडं काहीतरी खायला आणतो म्हणून गेलाय." आजी बाहेरच्या दिशेला हात करत म्हणाली.

"ठीक आहे, तुम्हाला काय होतंय?" आज्जीच्या हातातला पेपर हाती घेत विचारलं.
"काहीच नाही." म्हातारीचं पुन्हा तेच उत्तर.
"मग मुलगा तुम्हाला कशासाठी घेऊन आलाय?"
म्हातारी थोडा वेळ शांत राहिली आणि काही स्पष्ट काही अस्पष्ट शब्दात बोलू लागली,
"आमी पंढरपूरला आलोय दर्शन घ्यायला. मला माझा मुलगा म्हणला, तुला दवाखान्यात दाखवू, सलाईन लावून मग मंदिरात जाऊ तर हित्ं नुसती गर्दी...
"सलाईन का लावायचं होतं आजी? आम्ही तेच तर विचारतोय, काय त्रास होतोय?" नर्सनं विचारलं
"इठ्ठला शपथ सांगते, मला कायीच झालं नाही. तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही, माझ्या मुलाला बोलवा. तो म्हणला चल दवाखान्यात म्हणून आले."
"किती वेळ झाला आजी त्याला जाऊन?"
"लई वेळ झाला... तासभर होऊन गेला असंल."

आजीला विचारलं काही मोबाईल नंबर‌ वगैरे आहे का मुलाचा.‌ आजीजवळ दहा दहाच्या काही नोटा सोडल्या तर काहीच नव्हतं, काही चिठ्ठी नव्हती, कागद नव्हता. गावाचं नाव विचारलं तर त्यांना काही कळत नव्हतं.

सगळा प्रकार लक्षात येऊ लागला होता... आजीला कसं सांगावं हा प्रश्न पडला होता, म्हातारी पोराची वाट बघत बसली होती.
तसेच कसेतरी शब्द जुळवून सांगावं लागलं,
"आज्जी... हे गाव पंढरपूर नाही... खूप दूर आहे तिथून. तुझा मुलगा तुला इथं सोडून गेला आज्जे!"

तिला कळलं की नाही माहीत नाही... म्हातारी निर्विकारपणे बघत राहिली. खोल गेलेल्या डोळ्यांनी ती अजूनही तशीच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे ती पाहत होती. पुढचे जवळपास तीन तास तशीच बसून होती. या मधल्या काळात पोलिसांना सांगितलं... आजीच्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही.

आपल्या देशात अशा मोठ्या सरकारी दवाखान्यात असंख्य म्हाताऱ्यांना बेवारस सोडलं जात. घरी सांभाळणं होत नाही, त्यांची अडचण वाटते, एखाद्याला दुर्धर आजार असतो, सासु सुनेचा वाद असतो... खरंतर त्यांचा उपयोग संपलेला असतो !

वृद्धाश्रमात ठेवलं तर लोक नावं ठेवतात. गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊन हात सोडून द्यायची प्रत्येकाची हिम्मत होत नाही... हो काहीजण तेही करतात ! बरं सरकारी दवाखान्यातच का? कारण इथं खायला भेटतं, इथं सतत कोणी ना कोणी अन्नदान करत राहतं. कसे का असेनात पण उपचार भेटतात, डोक्यावरती छप्पर भेटतं. नजरेआड 'आपलं माणूस' जिवंत राहण्याची खात्री वाटते. जा मायबापानं हे जग दाखवलं त्यांच्याबद्दल एवढी तर काळजी वाटलीच पाहिजे ना?

म्हातारी एका ठिकाणी बराच वेळ बसली होती. बऱ्याच वेळानं तिला कळलं असावं सगळं... बसल्या जागेवर ती काहीतरी पुटपुटत होती...

काय सुरू असेल म्हातारीच्या मनात? काय काय आठवत असेल तिला? पोटात असतानाची त्याने केलेली पहिली हालचाल. जन्मल्यावर पहिल्यांदा दोघांची झालेली नजरानजर ! प्रेमाची असंख्य आलिंगनं ! त्या इवल्याशा बाळाचं रडणं, त्याचं पडणं, खेळणं... नजरेसमोर मोठं होणं !

लहानपणी कधीतरी गर्दीत पोरगं काही क्षणासाठी नजरेआड झालं असेल तर आईचा जीव गळ्यापर्यंत आला असेल ! आज तोच मुलगा अनोळखी गर्दीत हात सोडून गेला... खोल डोळ्यातील शेवाळलेली विहीर पाझरू लागली होती...

डॉ. प्रकाश कोयाडे सर यांच्या वॉल वरून
#मराठीभाषा #स्टोरी

चारित्र्य..... एक सत्यकथा....सकाळचे आठ वाजले होते, मी माझी सर्व नियमित कामं आटपतोय इतक्यात एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, ...
20/02/2026

चारित्र्य..... एक सत्यकथा....

सकाळचे आठ वाजले होते, मी माझी सर्व नियमित कामं आटपतोय इतक्यात एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, कॉल वरील महिला म्हणाली सर आम्ही आलोय ओपिडीला माझी आजची अपॉइंटमेंट आहे. मी म्हटलं तुम्ही खूप लवकर आलात, मी नऊ वाजेपर्यंत पोहचतोय. मी गडबडीत सर्व आटपून रोजच्यासारखं बरोबर नऊ वाजता ओपिडीला पोहोचलो.
केबिनमध्ये प्रवेश करून मी माझ्या चेअरवर बसेपर्यत मघाशी कॉल केलेली ती महिला माझ्या समोर येऊन बसल्या. चिंताग्रस्त चेहऱ्यातील ती महिला आपल्या नवविवाहित मुलीला घेऊन आली होती. मी स्मित करत विचारलं बोला काय सेवा करू काकू?? त्या महिला शब्दाची जुळवाजूळव करत मला म्हणाल्या की, साहेब ही माझी मुलगी गेल्या महिन्यात हिचं लग्न झालंय. इतकं बोलून त्या शांत बसल्या. मी लगेच म्हटलं काकू घाबरू नका, मला तुमचा मुलगा समजून बिनधास्त बोला. मी इतकं बोलूनही त्या काकू बावचळलेल्या नजरेने इकडं तिकडं पाहत होत्या, त्यांची मुलगी तर मान खाली घालून बसली होती.
शेवटी मीच सुरुवात केली. मुलीला काही अडचण आहे का?मुलीला सासरी त्रास वगैरे आहे का? मी असं बोलल्यावर त्या काकू म्हणाल्या साहेब आमची फसवणूक झाली माझ्या लेकराचे वाटोळं झालं.. असं म्हणतं त्या काकूंनी डोळ्याला पदर लावला.. मी त्यांना समजुतिच्या स्वरात म्हटलं नेमकं काय झालं काकू? नेमकी काय फसवणूक झाली नीट सांगा म्हणजे आपण काहीतरी मार्ग काढूया... (काकू जे बोलल्या ते मी माझ्या भाषेत लिहीत आहे.) लग्न होऊन दीड महिना झाला तरी मुलगी आणि तिच्या नवऱ्यात शारीरिक नातं होऊ शकलं नव्हतं. आणि या सर्व गोष्टीला मुलीच्या सासरकडील मंडळी मुलीलाच वाईट बोलून दोष देत होते. मुलीच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवत होते.
काकूंनी मला सर्व सांगून झाल्यावर मी काकूला धीर देत म्हटलं, मला तुमच्या जावयाचा नंबर द्या. मी बोलवून घेतो त्यांना. म्हणजे समोरासमोर नेमकं काय ते दोघांनाही तपासून मी सांगेन. मी त्या जावयाला कॉल केल्यावर सुरुवातीला तो मलाही उद्धट बोलला. मी पोलीस केसची भीती दाखवल्यावर तो दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येण्यास तयार झाला.मी त्या काकू आणि मुलीला म्हटलं तो उद्या येतोय तुम्ही उद्या लवकर तो यायच्या आधी या..
दुसऱ्या दिवशी त्या मायलेकी लवकरच येऊन वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. मी एकामागोमाग एक माझे पेशंट घेत होतो. दुपारी तीन वाजता माझे सर्व पेशंट संपले तरी त्या मायलेकी वेटिंग रूममध्ये बसून होत्या. शेवटी त्यांना केबिनमध्ये बोलावलं. त्या म्हणाल्या जावई आलाय पण तो तुमच्या ओपिडीच्या बाहेर फिरतोय. मी त्याला कॉल करून आत बोलावलं..
तो माझ्या केबिनमध्ये आला, त्याला हळुवार बोलत बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण तो जावई मुलगा बोलायला तयार नाही. शेवटी मी वातावरण ओळखुन त्या मायलेकींना केबिनच्या बाहेर थांबायला सांगितलं.. त्या बाहेर गेल्यावर जावयाची तपासणी केली आणि त्याला बोलतं केलं... तपासणी केल्यावर लक्षात आलं की त्या मुलाने बालवयात केलेल्या काही चुकामुळं तो मुलगा लैंगिक शक्ती तो हरवून बसला आहे. त्यामुळे तो लग्न होऊन दीड महिना झाला तरी पत्नीशी गोडनातं (हनिमून ) करू शकला नाही. मोबाईलवर अति पॉर्न व्हिडीओ पाहून तो पूर्ण उद्वस्थ झाला आहे. तो गे पण नाही पुरुष पण राहिला नाही.. त्याचे लैंगिक प्रॉब्लेम बायकोच्या लक्षात येऊ नये म्हणून तो खूप चिंताग्रस्त होता. मी त्याला विचारलं तुझे प्रॉब्लेम तुला माहिती असताना तु लग्नाआगोदरच ट्रीटमेंट घ्यायला हवी होती.
सर्व प्रॉब्लेम लक्षात आल्यावर त्या मायलेकींना मी परत माझ्या केबिनमध्ये बोलावलं आणि त्यांच्या समोर मुलाला सांगितलं विनाकारण तुझ्यात दोष असताना त्या मुलीला बदनाम करू नकोस असं सांगितलं. त्या काकूंना म्हणजे मुलीच्या आईला धीर देत म्हटलं काकू तुम्ही घाबरू नका, तुमची मुलीला माझी छोटी बहीण समजून तिचा संसार उभा करून देतो. आणि त्या मुलाला पण विचारलं की तुझ्यात दोष असताना त्या निरागस मुलीला का बदनाम करतोय असा जाब विचारला.आणि त्याला विश्वास दिला की अझोस्पर्मिया असणारे पेशंट सुद्धा मी रिकव्हर केलेत. तु फक्त रेग्युलर ट्रीटमेंट घें, तु सुद्धा रिकव्हर होशील.
तो मुलगा ट्रीटमेंट घ्यायला तयार झाला. ट्रीटमेंट नंतर तो मुलगा पूर्ण नॉर्मल झालाय . दीड महिन्यानंतर त्या मायलेकींना मी परत बोलावलं. तुमचा जावई पूर्ण पुरुष झाल्याचं ( पूर्ण माणसात आल्याचं )त्या काकूंना सांगितलं. त्या मुलाला विनाकारण मुलीची म्हणजे त्याच्या बायकोची बदनामी केली म्हणून सर्व नातलगासमोर माफी मागायला लावली.. त्या मुलाने बायकोची माफीही मागितली.कोव्हीडनंतर आता त्या दोघांचा सुखाचा संसार चालू आहे.मी पण रोज वेगवेगळ्या पेशंटचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यात बिझी आहे..

जवळजवळ दोन वर्षांनी काल त्या काकू, त्यांची मुलगी जावई आणि बरेच नातलग घेऊन मला भेटायला आल्या होत्या. काकूंच्या कडेवर बाळं होतं. काकूंनी माझी नजर चुकवत ते बाळं म्हणजे त्यांची नातं माझ्या पायावर ठेवली.. मला काय बोलावं ते समझेना. माझ्या पेशंटला रिझल्ट आला त्यांचा सुखाचा संसार चालू आहे यातच माझं सुख.....
त्या काकू सर्व नातंलगाना सांगत होत्या की हा डाक्टर माझ्यासाठी देव हाय .....

डॉ. वैभवसिंह सुभाष भोसले. (सोलापूर )
मो :--72640 25011

तळटीप :- आमच्याकडे ऍझोस्पर्मिया पेशंटसुद्धा रिकव्हर होतात..

Address

Beed
Ashti

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avdhut-अवधूत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Club

Send a message to Avdhut-अवधूत:

Shortcuts

Share